Monday, February 29, 2016

सतराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे

कधीतरी प्रकाश पाठारे ह्यांची एक कविता वपुंच्या 'आपण सारे अर्जुन' ह्या पुस्तकात वाचनात आली होती.

सत्तर वर्षांच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं, "आजी, आज इथं काय आहे?"
त्यावर तिनं उत्तर दिलं, "सतराव्या वर्षी माझ्यावर  बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे."

बत्तीस न्यायाधीश, वीस वकील, चाळीस शिरस्तेदार बदलून गेले. 
निम्मे साक्षिदार मरून, तर बाकीचे केव्हाच  पळून गेले. 
कितीतरी बलात्कारित स्त्रिया मरून गेल्या.  मी मात्र जिवंत, हीच एक कमाल  आहे. 

भगवान के घर देर है … ही म्हण अजून बदललेली नाही. 
न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी थोडीसुद्धा  सरकली नाही. 
मोर्चे, आंदोलने तेव्हाही झाली, नंतर कुणी फिरकलं नाही,
तरीसुद्धा वाटतं, आज जीवनाची सकाळ आहे.
सतराव्या वर्षी माझ्यावर  बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे.

थरथरत्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी चार भिंतींच्या आत नेलं .
निकाल ऐकून मात्र तिचे पाय लटपटू लागले. पुराव्याअभावी काही आरोपी निर्दोष सुटून  गेले.
ज्यांना शिक्षा झाली , ते  तर कधीच मरून गेले.
सत्तर वर्षांच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे .
सतराव्या वर्षी झालेल्या  बलात्कारावर हा न्यायालयाचा अजून एक बलात्कार आहे.. 

Friday, May 15, 2015

मन उधाण वाऱ्याचे

Add caption

मार्च एप्रिल महिन्यापासनं जंगलाच्या सभोवताल पळस बहरलाय. जंगलात प्रवेश करण्याच्या  भरपूर आधी प्रवासातच हा वाटेकरी आपले स्वागत करत अन रंगांची उधळण करत आयुष्य कसं जगावं ह्याची शिकवण देताना दिसून येतो. किती दिवसांचंच ते बहरणं पण वर्षभर हया सौंदर्याची उधळण डोळ्यात साठवून असते.

मनात येतं, आपल्याला असं  आयुष्य जगता येईल ? स्वतः कडे जे जे काही आहे ते ते सगळं उधळून टाकायचं आणि रिती झोळी घेऊन तटस्थपणे जीवनाकडे बघायचं.

परमेश्वराकडे काही मागावंसं वाटलं तर असं आयुष्य जगण्याची कला अंगी दे आणि तसं करण्याचं बळ दे, एवढंच मी मागेन.

Sunday, February 8, 2015

राधिका

तुम बिन हथेली की हर लकीर प्यासी है !
तीर पार कान्हा से दूर राधिका-सी है !!

श्याम की उदासी में याद संग खेला है !
कुछ गलत न कर बैठे मन बहूत अकेला है  !!

औषधी चली आओ चोट का निमंत्रण है !
बासूरी चली आओ होठ का निमंत्रण है !!

कुमार विश्वासची ही रचना आहे बहुतेक. ओळी वाचताना डोळ्यात खोल कुठेतरी संध्याकाळचा एखादा प्रसंग आठवतो आणि आपण कुठेतरी खोल शून्यात हरवतो.

एखाद्या सांजवेळी कशासाठी, कोणासाठी आणि आणखी किती दिवस असे अनेक प्रश्न मनात डोकावू लागतात. आपण जे कार्य हाती घेतले आहे ते करताना कधी खरंच एकाकी वाटायला लागतं आणि अशा कवितेच्या ओळी मदतीला धावून येतात.


Wednesday, September 7, 2011

आकाशाचा बादशहा

 तो मनमौजी आह़े त्याला आकाशात मुक्तसंचार करायला आवडते. मोकळे जंगल वास्तव्यासाठी त्याला आवडत असले तरी शहरी वातावरणाशीदेखील त्याने व्यवस्थित जुळवून घेतलंय.  भक्ष्याला पकडण्यासाठी ताकदीपेक्षा भन्नाट वेगाचा तो जाणीवपूर्वक उपयोग करतो कारण, वेग हीच त्याची खरी ताकद आह़े तो वेगाचा राजा आहे. म्हणूनच ‘आकाशाचा बादशहा’ आह़े.

_____________________________________________________
 
लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला "आकाशाचा बादशहा" हा आठवा लेख वाचण्याकरिता कृपया खालील लिंकवर click करा.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=61566:2010-04-10-20-01-49&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109

Monday, September 5, 2011

अस्तित्वाची लढाई

अचानक माकडांचा गलका वाढला. लहान पिल्लांच्या चि..चि.. आवाजातली भीती स्पष्टपणे जाणवू लागली. मी दचकून जागा झालो. समोर काहीतरी भयंकर असं थरारनाट्य घडत असल्याची जाणीव झाली. उठून झाडाखाली बसून राहिलो. पण, माकडांचं माझ्याकडं अजिबातच लक्ष नव्हतं.

रंग्याचं नेतृत्व अमान्य करून टोळीतल्या तरुण नर माकडांनी टोळीचा नायक ‘रंग्या’ विरुद्ध बंड पुकारलं असावं आणि रंग्या त्या माकडांना दडपशाहीच्या मार्गाने प्रतिआक्रमण करून प्रत्युत्तर देत असावा असं मला वाटलं पण, माझा अंदाज साफ चुकला होता. रंग्याच्या टोळीवर दुसऱ्या टोळीतल्या काही तरुण नरांनी आक्रमण केलं होतं.
____________________________________________________________

 
लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला "अस्तित्वाची लढाई" हा सातवा लेख वाचण्याकरिता कृपया खालील लिंकवर click करा.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=58028:2010-03-27-18-21-19&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109

निसर्गगान

नागरिकरणामुळे पक्ष्यांचे शहरातील अस्तित्व धोक्यात येत चालले आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या सुरांचेदेखील! हे अस्तित्व टिकवण्यासाठीच्या लढाईला आता युद्धाचे स्वरूप लाभले आहे. आपल्याकडून निसर्गाला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करायला हवा तरच ही सुरांची अनोखी मैफील आपल्याला भविष्यात ऐकायला मिळू शकेल अन् त्या सुरांची पूजा करायला मिळेल. या सुरांचं दर्शन पदोपदी, क्षणोक्षणी आणि नित्यनेमाने व्हावं एवढंच निसर्गाकडे मागणं!

__________________________________________________________
लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला "निसर्गगान" हा सहावा लेख वाचण्याकरिता कृपया खालील लिंकवर click करा

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=54589:2010-03-13-17-23-26&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109

Sunday, September 4, 2011

अधुरी एक कहाणी !!

राणीवर लाकडं ठेवली जात असताना मी गळून चाललो होतो. काहीवेळाने चिता पेटली़.  मृत्यू राणीचा झाला होता आणि संपलो मी होतो़. लाकडं तिच्यावर ठेवली होती आणि जड मी झालो होतो़. चिता तिची पेटली होती आणि मी जळून राख झालो होतो !

 
कहाणी संपली होती अन् आमचा डाव अर्ध्यावरती मोडला होता.

_______________________________________________________________

लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला "अधुरी एक कहाणी" हा पाचवा लेख वाचण्याकरिता कृपया खालील लिंकवर click करा.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=51320:2010-02-27-20-29-20&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109